DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनिल भाईदास पाटील यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्रीपद

जळगाव :  राज्यातील राजकीय भूकंपानंतर अजित पवार यांनी आमदारांसह शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागली तर त्यांच्यासह अन्य आमदारांनाही मंत्री पदाची संधी मिळाली. त्यात अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचीदेखील मंत्री पदाची वर्णी लागल्यानंतर त्यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास तिसरे मंत्रीपद मिळाले आहे.

काही तरी घडणार हे स्पष्टच होते : आज राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घटना घडल्या. आज सकाळपासून अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू झाली. यानंतर इतर नेते हे शरद पवार यांच्या निवासस्थानी जमा झाल्याने काही तरी मोठे घडणार असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास अजित पवार हे आपल्या सहकार्‍यांसह राज्य सरकारमध्ये सहभागी झाले व त्यानंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ मंत्र्यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.

अत्यंत विश्वास सहकारी : अनिल भाईदास पाटील हे अजितदादा पवार यांचे अतिशय जवळचे सहकारी असून पहाटेच्या शपथविधीच्या प्रसंगात देखील ते त्यांच्या सोबत होते. यानंतरच्या कालखंडातही ते अजितदादांचे निकटवर्तीय म्हणूनच ओळखले जात आहेत. यामुळे त्यांना मंत्रीपद मिळाले असून या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास तिसरा मंत्री मिळाला आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.