DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी,समाजबांधव सत्कार समारंभाचे आयोजन

जळगाव – चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून इतरांना प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षाप्रमाणे या वर्षी देखील जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी/समाजबांधव यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाजातील अधिकारी/पदाधिकारी/आमदार/ खासदार/महापौर यांना निमंत्रित केले जाणार आहे.या वर्षी देखील मागील वर्षाप्रमाणेच गुणवंत विद्यार्थी निकष कायम ठेवून इ.10 वी ला शेकडा 80%, इ.12 वी ला शेकडा 75%,तसेच विविध शिक्षण शाखेतील पदवी,पदविका,पदव्युत्तर पदवी,डॉक्टरेट इ.मध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंतांचा तसेच शासकीय परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या,तसेच नवोदय विद्यालय,आय.आय. टी,.मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेशास पात्र ठरलेल्या ,राज्य/राष्ट्रीय स्तरावरील खेळात सहभागी होऊन उल्लेखनीय यश मिळविलेल्या खेळाडूंचा तसेच शासकीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या कर्मचारी/अधिकारी/पदाधिकारी व समाजात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंत समाज बंधू- भगिनिंचा सत्कार रोख बक्षिसे, स्मूर्ती चिन्हे,प्रशस्तीपत्र,प्रेरणादायी पुस्तके , गुलाबपुष्प देऊन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जुलै महिन्या अखेर करण्यात येणार असून गुणवंत विद्यार्थी/ बंधू- भगिनी यांनी आपल्या गुणपत्रक/प्रवेशपत्र /प्रमाणपत्र व आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स किंवा pdf .किंवा प्रत्यक्ष प्रस्ताव श्री.संजय वानखेडे (9423487339),डॉ.सुनील सूर्यवंशी ( 9822961026),प्रा.गणेश सूर्यवंशी(9764586454),श्री.गजानन दांडगे (9511782669),श्री.यशवंतराव ठोसरे(7972729485),प्रा.डॉ.श्री.सुनील निंभोरे(9021563448),प्रा.श्री.विठ्ठलराव सावकारे (9420787409)श्री.विजय पवार (9421640398),श्री.कैलास वाघ(9421636432),श्री.खंडू पवार(9850222667) यांचेकडे *आपले प्रस्ताव दिनांक 15 जुलै 2023 पर्यंत पाठविण्याचे आवाहन गुणवंत सत्कार समितीने केले आहे

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.