जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमिलन व बचत गट महिला मेळाव्याचे आयोजन
जळगाव : बँकेच्या स्थापनेस दि.20 जानेवारी 2023 रोजी 44 वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने बँकेच्या मुख्य कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री कृष्णा कामठे, बँकेचे ज्येष्ठ संचालक सतीश मदाने तसेच संचालक मंडळ सदस्य व केशवस्मृति सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष श्री भरतदादा अमळकर, सचिव श्री रत्नाकर पाटील बँकेचे माजी अध्यक्ष श्री संजयजी बिर्ला आदि सदस्य उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधींनी मुख्य कार्यालयात तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला व शुभेच्छा दिल्या. बँक नेहमीच आधुनिक तंत्रज्ञांनाचा वापर करून आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. याप्रसंगी बँकेने नवीन मोबाइल अॅप सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
वर्धापनदिनाचे औचित्य साधून बँकेचे मुख्यालय “सेवा” येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यालयात बँकेचे संचालक डॉ सुरेन्द्र सुरवाडे यांचे हस्ते सपत्नीक श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.
बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे भव्य बचत गट महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे रोटरी क्लब एलाइट जळगावचे अध्यक्ष नितीन इंगळे, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे प्रसाद देवधर, कार्यक्रमाचे अध्यक्ष बँकेचे ज्येष्ठ संचालक सतीश मदाने, बँकेच्या संचालिका सौ संध्याताई देशमुख, डॉ सौ आरतीताई हुजुरबाजार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास सुमारे 3000 महिलांची उपस्थिती होती
बचत गट संघटन – संघटनातून महिलेच्या चेहर्यावरचा मुखवटा उतरवून चेहरा वाचण्यासारखा करणे व महिलांना व्यवसाय करण्यासाठीचे प्रशिक्षण देणे, असे प्रतिपादन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमास व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष कृष्णा कामठे, संचालक सतीश मदाने, हरिश्चंद्र यादव, डॉ.आरती हुजुरबाजार, कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ अतुल सरोदे, जयंतीलाल सुराणा, विवेक पाटील, ललित चौधरी, नितीन झंवर, संजय प्रभुदेसाई, डॉ सुरेन्द्र सुरवाडे, हिरालाल सोनवणे, सुशील हासवाणी, सपन झुनझुनवाला, पराग देवरे, संध्या देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.