DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने विविध ठिकाणी जामनेर शिवसैनिकांच्या वतीने कार्यक्रम संपन्न.

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे

 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज रोजी विविध ठिकाणी जामनेर शिवसैनिकांनी कार्यक्रम संपन्न केले. दि- 23 जानेवारी  आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महोत्सव वेगवेगळ्या कार्यक्रमांनी आज तालुका भर साजरा करण्यात आला. तालुक्यातील जामनेर शहरात नगरपालिका चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले अभिवादन प्रसंगी जामनेर तालुका प्रमुख श्री. ज्ञानेश्वर बोरसे युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख नरेंद्र धुमाळ, शिवसेना शहर प्रमुख अतुल सोनवणे,ज्ञानेश्वर जंजाळ, मा. शहर प्रमुख पवन माळी, तालुका संघटक विष्णू सोनवणे, शहर प्रमुख विलास पाटील, युवासेना विशाल भोई, सुधाकर सराफ,उस्मान शेख,प्रशांत सुरवाडे, राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे बाजीराव पाटील,काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत,किशोर मोरे,अमोल रोकडे,तुकाराम गोपाळ ,अंकुश जोशी इ.शिवसैनिक उपस्थित होते.  गंगापुरी येथे आश्रमशाळेत जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले.या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख दिपक सिंग राजपूत, युवासेना उप-जिल्हाप्रमुख राहुल भाऊ चव्हाण,तालुका प्रमुख श्री.ज्ञानेश्वर बोरसे,नरेंद्र धुमाळ,विशाल भोई,अंकुश जोशी,दिपक जोशी शाळेतील शिक्षक वृंद-कर्मचारी उपस्थित होते.तालुक्यात वाघारी,पहुर,शेंदुर्णी,नेरी,वाकोद, तोंडापूर, फत्तेपूर इ.ठिकाणी अभिवादन पर कार्यक्रम घेण्यात आला.   हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने तालुक्यात एक नवीन संजीवनी शिवसेनेला प्राप्त झाली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.