नेरी केंद्र शिक्षण प्रसारक अमृतराव चिंधुजी पाटील माध्यमिक विद्यालयात अमृत रंग स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
जळगाव – दादासाहेब अमृतराव चिंधुजी पाटील माध्यमिक विद्यालयात दिनांक 21.1.2023 रोजी अमृत रंग स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले या अमृत रंग स्नेहसंमेलन सोहळ्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन माननीय नानासाहेब प्रमोद अमृतराव पाटील यांनी केले यावेळी संस्थेच्या सेक्रेटरी सन्माननीय ताईसाहेब वर्षाताई प्रमोद पाटील ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या मनोगतात ताई साहेबांनी विद्यार्थी दशेत आपल्या मनावर कोरलेले संस्कार आयुष्यभर तसेच राहतात हे विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना विशद केले इतक्या मोठ्या संख्येने संध्याकाळी सिरीयल च्या व कामाच्या वेळेला महिला पालकांनी उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले यावेळी रोटवद गावच्या माजी सरपंच सौ विद्याताई रामधन पाटील संस्थेचे स्थानिक संचालक श्री रामधन दादा त्रंबक पाटील मल्हार सेना जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ दांडगे मोरगावचे सरपंच भाऊ सिंग चव्हाण यांनी उपस्थिती दिली यावेळी मोरगाव रोटवद नांद्रा मोहाडी येथील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी ए पाटील सर यांनी केले सरांनी शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे चेअरमन माननीय नानासाहेबांनी मुलींच्या शिक्षणाला महत्त्व देऊन स्वर्गीय दादासाहेबांनी लावलेले छोटेसे रोपटे वटवृक्षात कसे रूपांतर झाले शाळेत शिक्षण घेतलेले अनेक डॉक्टर इंजिनियर पोलीस पी.एस.आय आज उच्च पदावर कार्यरत आहेत हे स्वाती आगळे या माजी विद्यार्थिनीचे उदाहरण देऊन स्पष्ट केले कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाले. लोकनृत्य गरबा गोंधळ नृत्य नाटिका असे एकाहून एक बहारदार कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी आनंद लुटला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे विद्यार्थ्यांनी केले हे सर्वांचे प्रमुख आकर्षण ठरले.