जामनेर येथे श्री. माऊली संत सेना महाराज प्रतिष्ठान अध्यक्ष पदी प्रविण पर्वते व उपाध्यक्ष पदी ईश्वर शिंदे यांची नियुक्ती..
जामनेर : प्रतिनिधी
सालाबादाप्रमाणे श्री माऊली संत सेना महाराज प्रतिष्ठान जामनेर तर्फे नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी समस्त समाजबांधव उपस्थित होते यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी प्रवीण पर्वते व उपाध्यक्षपदी ईश्वर शिंदे तसेच सचिव पदी सुभाष पर्वते यांची निवड करण्यात आली.
श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा हा दिनांक 23 8 2022 मंगळवार रोजी साजरा करण्यात येणार असून दिनांक 24 /08 /2022 बुधवार रोजी सकाळी आठ वाजता श्री संत सेना महाराज यांचे प्रतिमेचे पूजन व अभीवादनाचा कार्यक्रम सकाळी नऊ ते 11 श्री संत सेना महाराज जीवन पर प्रबोधनाचा कार्यक्रम सकाळी 11:30 ते दुपारी दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाचे ठिकाण श्रीमंत बाबाजी राघोम पाटील मंगल कार्यालय पाचोरा रोड जामनेर तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या वतीने सर्व नाभिक समाज बांधवांना आग्रहाचे आमंत्रण करण्यात आले आहे.
उपस्थित कार्यक्रमाचे ज्येष्ठ सल्लागार श्री देविदास वखरे साहेब, प्रकाश शिंदे, काशिनाथ भाऊ पर्वते, भागवत भाऊ शिंदे ,पंढरी दादा महाले, रघुनाथ शिंदे ,सुभाष शिंदे ,राजाराम महाले, रवी भाऊ ,निकम दत्तू भाऊ बोडरे ,गोपाळ शेळके, विश्वनाथ भाऊ पर्वते,व आदी कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.