DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मराठा प्रीमियर लीग 2023 क्रिकेट प्रतियोगीताचे मोठ्या थाटात उदघाटन

जळगाव । प्रतिनिधी

दरवर्षी प्रमाणे गेल्या 5 वर्षापासून मराठा प्रीमियर लीग 2023 क्रिकेट प्रतियोगीताचे जळगाव शहरात दिनांक 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत सागर पार्क,जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धे मध्ये एकूण 36 पुरुष व 6 महिला संघ सहभागी होऊन खेळणार आहेत.माँ भटाई ग्रुप चे प्रदीप पाटील हे या मराठा प्रीमियर लीग 2023 क्रिकेट प्रतियोगीताचे  मुख्य प्रायोजक आहेत. ॲड.उज्वल निकम हे मराठा प्रीमियर लीग 2023 चे ब्रँड अँबेसेडर आहेत.

प्रतियोगीताचे उदघाटन खासदार उन्मेष पाटील ,आमदार मंगेश चव्हाण ,माजी मंत्री गुलाबराव देवकर ,प्रा.डी.डी. बच्छाव,राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्रभय्या पाटील , उपमहापौर कुलभूषण पाटील ,मनपाचे आयुक्त देविदास पवार ,  जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील , जिल्हा बँक संचालक अमोल पाटील , जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख , भाजपचे शहर प्रमुख दीपक सूर्यवंशी ,स्वामी समर्थ ग्रुपचे मनोज पाटील सर , उद्योजक श्रीराम पाटील ,प्रमोदनाना पाटील ,प्रदीप पाटील ,बाळासाहेब सूर्यवंशी ,मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील ,सुरेश पाटील ,राम पवार , ग.स.चे अध्यक्ष उदय पाटील , हॅन्डलूम इन्स्पेक्टर राकेश ठाकरे , अभिषेक पाटील ,करण पवार , शौर्य पुरस्कार प्राप्त हवालदार निलेश देशमुख ,तुषार सूर्यवंशी , सौ.लीना पवार , मराठा प्रीमियर लीगचे अध्यक्ष राहुल पवार यांचे हस्ते आज उदघाट्न पार पडले .मराठा प्रीमियर लीगचे उदघाटन समारंभाचे आयोजन आणि नियोजन समस्त आयोजन समिती मराठा प्रीमियर लीग यांनी केले होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.