DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेत पुणे अव्वल

जळगाव । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् ॲकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल जळगाव येथे ३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो क्युरोगी व पुमसे ( ज्युनिअर/सिनीयर ) स्पर्धा झाली. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या मुलं-मुलीचा संघाने 192 गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकाविले. 80 गुणांसह रत्नागिरी द्वितीय, 72 गुणांसह कोल्हापूर तृतीय, 56 गुणांसह जळगाव जिल्हा चतूर्थ क्रमांकाने विजयी ठरलेत. उत्कृष्ट खेळाडू बिड जिल्ह्याची नयन बारगजे, पुणे जिल्ह्याचा ओम बोरसे यांना सन्मानित करण्यात आले.

 

तीन दिवस झालेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरणाप्रसंगी अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ.निशा अनिल जैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासह क्रीडा मार्गदर्शक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे पुणे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खोकावाला जळगाव, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील रायगड, जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे,सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, जैन स्पोर्टस् अॅकडमीचे अरविंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. निशा जैन यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून प्रोत्साहीत केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी महेश घारगे, जयेश बाविस्कर यांच्यासह जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच जैन स्पोटर्स ॲकॕडमीचे सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
सुत्रसंचालन नेताजी जाधव यांनी केले.

तायक्वांडो स्पर्धा इलेक्ट्रॉनिक सिस्टीम द्वारे सेन्सर्सवर घेण्यात आली. यात राज्यभरातुन २६ जिल्ह्यातील तिनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

तायक्वांडो स्पर्धेचा निकाल
मुलं – 55 किलो वजनात आयुष ओहल, पुणे, सुवर्ण पदक, क्रिश बोहर, ठाणे, सिल्व्हर, प्रतिक माळी, सांगली, अभिषेक चौघुले कोल्हापूर ब्रान्झ पदक मिळविले.
मुलं – 63 किलो वजनात किरण मंदादे औरंगाबाद सुवर्ण पदक, कृष्णा मिश्रा पुणे सिल्व्हर, यश खराटे मुंबई, अंश गुंडाळे ब्राॅन्झ पदक मिळविले.
मुलं – 73 किलो वजनात जयेश पवार जळगाव सुवर्ण पदक, अमयदेव फुलेर पुणे सिल्व्हर, प्रज्वल दभाळे धुळे, ओम भगतकर यवतमाळ ब्रान्झ पदक मिळविले.
मुलं – 78 किलो वजनात अभिषेक सुकाळे पुणे सुवर्ण, ऋतिक कोतकर जळगाव सिल्व्हर, राज रसल रत्नागरी, करण जावळे औरंगाबाद ब्रान्झ पदक मिळविले.
मुलं- 78 किलो वजनाच्या वरती अमय सावंत रत्नागिरी सुवर्ण, रोशन वंजाळे पुणे सिल्व्हर, अभिजीत थोरात अहमदनगर, साई वरे ठाणे ब्रान्झ पदक मिळविले.
मुली – 42 किलो वजनातील वैभवी मेनकुदळे पुणे सुवर्ण, आकांक्षा दर्ड अहमनगर सिल्व्हर, अमृता मंडवे रत्नागिरी, रोशनी चटारे चंद्रपूर ब्रान्झ पदक मिळाले.
मुली – 44 किलो वजनातील तनिषा शिवहरी पुणे सुवर्ण, मयूरी कदम रत्नागिरी सिल्व्हर, दर्शना म्हात्रे मुंबई, साहयता यादव मुंबई ब्रान्झ पदक मिळविले.
मुली – 46 किलो वजनातील साक्षी पाटील पुणे सुवर्ण, गायत्री शेलार रत्नागिरी सिल्व्हर, श्वेता सावंत उस्मानाबाद, श्रद्धा रमावत अमरावती ब्रान्झ पदक मिळविले.
मुली – 63 किलो वजनातील सिद्धी बेंडाळे पुणे सुवर्ण, सुहानी धनल कोल्हापूर सिल्व्हर, समृद्धी सांगळे औरंगाबाद, युगा मेश्राम गोंदिया, ब्रान्झ पदक मिळविले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.