DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात प्रथमच राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल राज्यांच्या वरिष्ठ महिला संघांचा सहभाग

जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान होतील. वरिष्ठ गटाच्या ८० महिला खेळाडूंचा यात सहभाग असेल. महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ या स्पर्धेत असतील. जळगाव येथे प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेत राष्ट्रीय संघातील महिला खेळाडूंचाही समावेश आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जाईल. या स्पर्धेत प्रत्येक सामना हा २० षटकांचा असेल व तो साखळी पद्धतीने खेळविण्यात येईल. प्रत्येक संघाशी दोनदा लढत देईल. व स्पर्धेतील गुणतालिकेतील प्रथम दोन संघात अंतिम लढत होईल. या स्पर्धेसाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीतर्फे विजयी, उपविजयी संघाला चषक देण्यात येईल. तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वात्कृष्ट खेळाडूला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेतील उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक व मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिके सुद्धा देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उदघाटन दि. १५ सप्टेंबर ला सकाळी ८.३० वाजेला अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर होईल. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सील सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे (परभणी), अॅपेक्स कौन्सील सदस्य राजेंद्र काणे (जालना), जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रमेशदादा जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार व युसूफ मकरा, सहसचिव अविनाश लाठी, सचिव अरविंद देशपांडे व कार्यकारिणी सदस्य स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहतील. स्पर्धेचा उद्घाटन सामना महाराष्ट्र विरूद्ध त्रिपुरा यांच्यात सकाळी ९ वाजेला रंगेल. तर दुपारी १ वाजेला तामिळनाडू विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात होईल.

अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, अॅपेक्स कौन्सिल सदस्य राजेंद्र काणे, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांनी दिली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.