DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पालक संपर्क मेळावा कार्यक्रम जि.प शाळा पळासखेडे मिराचे येथे संपन्न

पळासखेडे मिराचे : प्रतिनिधी-प्रकाश पाटील

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळासखेडे मिराचे जामनेर येथे निपुन भारत अभियाना नुसार शासन परिपत्रकाप्रमाणे पालक संपर्क मेळावा आयोजन करण्यात आला.

सदर मेळाव्याचे औचित्य साधून शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात बाल आनंद मेळावा, माता पालक यांचे हळदी कुंकू कार्यक्रम तसेच भारतीय गणित तज्ञ श्री निवास रामानू जन यांच्या जयंतीनिमित्ताने गणितोत्सव या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमा वेळी उपस्थित गावातील आदरणीय सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सदस्य, गावातील शिक्षण प्रेमी व विद्यार्थ्यांचे माता- पालक, आणि गावकरी होते. यांनी सदर कार्यक्रमात उपस्थिती देऊन कार्यक्रमांचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात सूत्रसंचालन श्री सोनार सर यांनी केले असता आभारप्रदर्शन मुख्य ध्यापक श्री.महाजन सर यांनी केले. या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनीनी अथक  परिश्रम घेऊन  कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी रीतीने घडवून शांततेने पाडलेला आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.