भ्रष्टाचारी इमारत अखेर जमिनदोस्त, स्फोटापूर्वी वाजला सायरन, पाहा व्हिडीओ
नवी दिल्ली : नो एडाच्या सेक्टर-93A मध्ये स्थित ट्विन टॉवर आज जमीनदोस्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज दुपारी अडीच वाजता हा टॉवर पाडण्यात आला आहे.
सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्याची सर्व तयारी पूर्ण सकाळपासुन करण्यात आली. 13 वर्षात बांधलेल्या दोन्ही इमारती तोडण्यासाठी फक्त 9 सेकंद लागतील. ट्विन टॉवर पाडण्याची जबाबदारी एडिफिस नावाच्या कंपनीला मिळाली आहे. प्रकल्प व्यवस्थापक मयूर मेहता यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू होते.
— ANI (@ANI) August 28, 2022
टॉवर पाडण्यासाठी ‘वाटरफॉल तंत्रज्ञानाचा’ वापर करण्यात आला आहे. व्यवस्थापक मयूर मेहता यांनी सांगितले. समुद्राच्या लाटांप्रमाणे हा एक प्रकारचा वेविंग इफेक्ट आहे. ब्लास्टिंग तळघरापासून सुरू होईल आणि 30 व्या मजल्यावर संपेल. याला ऑफ एक्सप्लोजन म्हणतात.
ट्विन टॉवर्सचा स्फोट होताच संपूर्ण बिल्डिंग पाहता क्षणी खाली कोसळली. मात्र धुळीचे ढग सर्वत्र पसरले. सध्या धूळ कमी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी आधीपासून तैनात असलेल्या स्मोक गनचा सहारा घेतला जात आहे. याशिवाय पाणी फवारणीही केली जात आहे.
क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली
ढिगाऱ्याचा कचरा उचलण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. टीमला अपेक्षा आहे की 1 तासात आजूबाजूच्या रस्त्याचा सर्व बांधकाम कचरा साफ केला जाईल