DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

धक्कादायक ; कारच्या रेसिंगच्या नादात 11 वर्षिय बालकाचा मृत्यू

जळगाव । प्रतिनिधी

 

दोन चारचाकींमध्ये लागलेल्या शर्यतीत एका कारने विक्रांत संतोष मिश्रा (वय ११, रा.एकनाथ नगर) या सायकलस्वार बालकाला उडविले घटना रविवारी सायंकाळी चार वाजता मेहरुण तलावाकाठी घडली. हा अपघात इतका भयंकर होता की चारचाकीच्या धडकेत विक्रांत चेंडूसारखा १५ फूट वर फेकला गेला. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चारचाकी चालविणारा देखील १६ वर्षाचाच मुलगा आहे.

शहरातील मेहरुण तलाव लगत असलेल्या एकनाथ नगरात संतोष गिरजाशंकर मिश्रा हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते डी. जे. रिपेअरिंग करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. आज रविवार असल्याने शाळेला सुट्टी असल्याने त्यांचा मुलगा विक्रांत हा आपल्या चुलत भावासोबत दुपारच्या सुमारास मेहरुण ट्रॅकवरील नवीन पक्षीघराजवळ सायकल चालवित होता.

 

याचवेळी याठिकाणी काही कारचालक तरुणांनी कारची रेसिंग लावित तेथून भरधाव वेगाने कार चालवित होते. दरम्यान, रेसिंग सुरु असतांना (एमएच 19 बीयू 6006) क्रमांकाच्या इनोव्हा कारने सायकल चालविणार्‍या चिमुकल्याला जोरदार धडक दिली. यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.

 

कारच्या धडकेत चिमुकला जागीच ठार झाल्याने चिमुकल्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह बघताच त्याच्या आई-वडील सून्न झाले होते. तसेच चिमुकला हा मेहरुण परिसरातील विद्या इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

 

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.