DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

दक्षिण कोरियात विमान अपघात, ६२ जणांचे निधन

लँडिंगदरम्यान १८१ प्रवाशांसह विमान कोसळले

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क: दक्षिण कोरियामध्ये रविवारी सकाळी एक भीषण विमान अपघात झाला. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून १८१ प्रवासी आणि ६ कर्मचारी घेऊन आलेले विमान धावपट्टीवरून घसरल्यानंतर क्रॅश झाले. या घटनेत किमान ६२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपघातानंतर विमानतळावरच विमानाने पेट घेतला आणि ते जळून खाक झाले. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली असून बचाव पथके प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन व आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य सुरू असून घटनेचा अधिक तपशील अद्याप प्रतीक्षेत आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.