पुर्नाड फाट्याजवळ अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडून जळगावचा तरुण ठार
जळगाव / मुक्ताई नगर ;– नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मूर्ती आणण्यासाठी जळगावच्या मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथील तरुण बऱ्हाणपूर येथे देवीची मूर्ती घेऊन परतत असताना पुर्नाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाल्याने यात यात देवीची मूर्ती अंगावर पडून ३५ वर्षी तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून यामुळे मेहरूण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय उर्फ जितू गोपाल कोळी (वय ३५ रा. जोशी वाडा, मेहरूण) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , कॉलनीत नवरात्र उत्सवानिमित्त देवी बसवण्यासाठी तयारी झालेली होती. त्याकरिता देवीची मूर्ती बऱ्हाणपूर येथून आणण्यासाठी मंडळाचे काही कार्यकर्ते हे शनिवारी गेलेले होते. तेथून परतत असताना रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास पुरणाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये देवीची मूर्ती जितू उर्फ संजय कोळी यांच्या अंगावर पडल्याने त्याच्याखाली दाबून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्याच्या मित्रांनी तात्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. कुटुंबियांना मोबाईलद्वारे माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी जळगाव येथील एका कंपनीमध्ये तो खिडक्यांच्या सेंटरिंगचे काम करीत होता. दरम्यान मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जितू उर्फ संजय कोळी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.