पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ
पहुर ;– तालुक्यातील वाकडी येथील माहेर असलेल्या 31 वर्षीय विवाहितेला ऑफिस बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की वाकडी येथील माहेर असलेल्या स्वाती मुकेश जांगिड वय 31 यांचा विवाह मुकेश देवीलाल जांगिड यांच्याशी रितीरिबाच्यानुसार झालेला होता. विवाह नंतर एक डिसेंबर 2021 ते 20 जून 2023 पर्यंत पती मुकेश देवीलाल जांगिड सासरे देवीलाल मोहनलाल जांगिड ,सासू मंजू देवीलाल जांगिड ,सर्व रा. मानक नगर, गारखेडा ,औरंगाबाद ता. जि. संभाजीनगर यांनी ऑफिस बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत यासाठी चापटा बुक्क्यांनी मारहाण करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण चौधरी करीत आहे.