ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकत्यांचा भाजपात प्रवेश
जामनेर : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य तथा मालखेडा येथील विद्यमान उपसरपंच श्री. रामलाल बल्लु नाईक यांच्यासह सरपंच रेखा प्रमोद नाईक, वि का सोसायटी चे चेअरमन आत्माराम श्रीराम चव्हाण उपसंचालक गोपीचंद प्रशराम नाईक सर्व वि. का. सोसायटी सदस्य नीलाबाई इंदल नाईक, कैलाश लक्ष्मण चव्हाण आप्पा गब्रू नाईक, प्रमोद प्रसराम नाईक, रामा मांगो नाईक, गावाचे नायक धर्मा थानसिंह नाईक व सर्व ग्राम पंचायत सदस्य अशोक भरमाल नाईक, कैलाश हेम्राज नाईक, अंकुश प्रकाश नाईक, बसराज हिरा नाईक व गावातील तीनशे कार्यकर्त्यांसह मोराड येथील रा. काँ. पा. सरचिटणीस अरुण गणेश राठोड, किरण छगन चव्हाण यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश सोहळा पार पडला, यावेळी भा. ज. पा. जिल्हा उपाध्यक्ष गोविंद सेठ अग्रवाल, भा. ज. पा. तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर. जामनेर ता. एज्यू. सो. सचिव जितेंद्र पाटील, गोविंद अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्य अमितदादा देशमुख, नगरसेवक आतिष झाल्टे, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, माजी उप नगराध्यक्ष शरद पाटील सर भा. ज. यु. मोर्चा अध्यक्ष निलेश चव्हाण, डॉ.विश्वनाथ चव्हाण,भा. ज. पा. ज्येष्ठ नेते छगन दादा झाल्टे, रमेश नाईक सर्व नगरसेवक व भा. ज. पा. जामनेर तालुका पदाधिकारी उपस्थितीत होते.
तसेच सोबत मालखेडा येथील भा. ज. पा. चे गावातील सर्व पदाधिकारी इंद्रजित संगजी पवार, इंदल चेंसिंग नाईक, आंबेवडगाव चे सरपंच वसंत भिवसिंघ पवार, मोराड सरपंच अविनाश नाईक सर्व भा. ज. पा. ग्राम पंचायत सदस्य अर्जुन जयराम चव्हाण, इंदल मुलचंद चव्हाण, देविदास पवार, जगन नाईक, विश्वनाथ चव्हाण, संदीप पवार, गोपीचंद नाईक, रोहिदास नाईक, भागचंद नाईक, संजय राठोड, विशाल चव्हाण, अशोक नाईक उपस्थित होते.