भाजपाच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी संगीता गवळी
जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती
जळगाव | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीतर्फे जळगाव जिल्हा पश्चिम विभाग महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी संगीता राजेंद्र गवळी तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी जितेंद्र रघुनाथ पाटील यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील – जळकेकर महाराज यांनी केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांच्या सुचनेनुसार दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. खासदार उन्मेश पाटील यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे स्वागत केले.