रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर !
मुंबईत अजित पवारांची घेतली भेट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार
रावेर : रावेरचे प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची मंगळवार, 9 रोजी त्यांच्या निवासस्थानी भेट चर्चा केली व आपली भूमिका मांडली. श्रीराम पाटील हे लवकरच रावेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश करणार आहेत.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचीही यावेळी भेट घेतली. याप्रसंगी श्रीराम पाटील यांच्यासोबत जळगाव राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, डी.डी.बच्छाव, रावेर माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, प्रा.गोपाल दर्जी, मराठा सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रामदादा पवार, भाऊसाहेब सुरेश पाटील, प्रवीण बोरसे, इरफान तडवी आदी उपस्थित होते.