DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा- अनिकेत पाटील

गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सरपंच निवासी प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

जळगाव | प्रतिनिधी 

ग्रामविकासामध्ये ग्रामपंचायतीचे महत्त्व खूप आहे त्याचे अधिकार समजून घेताना सरपंचांनी आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या समजून घेतले पाहिजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास करता येऊ शकतो यासाठी रचनात्मक कार्य केले पाहिजे, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सुरू असलेल्या यशदाच्या सरपंच निवासी प्रशिक्षण शिबीर सरपंचांनी मोलाचे मार्गदर्शक ठरू शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी केले.

 

यशदा प्रशिक्षण केंद्रातर्फे सुरू दि.20 ते 23 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या निवासी सरपंच प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी अनिकेत पाटील बोलत होते. दीप्रज्वलनाने सुरवात झाले. अनिकेत पाटील यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे नितीन चोपडा, यशदा सत्र समन्वयक कल्पना पाटील, यशदा प्रविण प्रशिक्षक अशोक पाटील, पीआरटीसी खरोदा सेवानिवृत्त प्राचार्य रमेश चौधरी उपस्थित होते.

 

जागतिक संघटना युनोने शाश्वत विकासासाठी १७ संकल्पांसह २०३० पर्यंत कार्य करण्याचे ठरविले असून यात १९४ देशांनी सहभाग घेतला आहे. त्या संकल्पना, ध्येयांविषयी जनजागृतीसाठी भारताने नऊ विकासात्मक संकल्पनांवर काम सुरू केले असून यातील कमीत कमी तीन संकल्पांवर कृतिशील काम करून गावागावांमध्ये विकासगंगा पोहचविण्याचे ध्येय निश्चिती केले आहे. यानुसार पुणे यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ शेड्डी, सत्रसंचालक दत्तात्रय पोहरे यांच्या मार्गदर्शनानुसार गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सरपंच परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये चाळिसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा, चोपडा या तालुक्यातील सुमारे ३० च्यावर सरपंचांनी सहभाग घेतला. गांधीजींचा विचार हा ग्रामविकासाच महत्त्वाचा केंद्र आहे त्यानुसार हे प्रशिक्षण प्रासंगिक असल्याचे नितीन चोपडा यांनी सांगितले. आज रमेश चौधरी यांनी ग्रामपंचायत अधिनियम, ग्रामसभेसह सर्वसभा, ग्रामपंचायत पंचाग, दफ्तरांच्या नोंदी १ ते ३३ नमुने यावर मार्गदर्शन केले. अशोक पाटील यांनी लेखासंहिता, अंदाजपत्रक, लेखा परिक्षण, आर्थिक नियोजन, ताळेबंद यासह महत्त्वाच्या नोंदी यावर मार्गदर्शन केले. कल्पना पाटील यांनी खेळ दोन पाऊल पुढे दोन पाऊल मागे यातून रंजकपद्धतीने एसडीजी थीमने गावातील वंचित घटकांना सोबत घेऊन शाश्वत विकास कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले. प्रस्तावना व आभार कल्पना पाटील यांनी मानले.

खेळातून आपली कर्तव्य व अधिकार समजून घेताना सरपंच.
यशदातर्फे सुरू असलेल्या सरपंच निवासी प्रशिक्षण शिबीराचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना अनिकेत पाटील, नितीन चोपडा, कल्पना पाटील, रमेश चौधरी.
बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.