DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

Share Market : मार्केटच्या घसरणीत ‘हे’ 3 शेअर्स खरेदी करून करा बक्कळ कमाई

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार मंदीच्या स्थितीत आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या बातम्या तुम्ही रोज पाहत असाल.

परंतु काही गुंतवणूकदार अशाच पडझडीची वाट पाहतात आणि चांगले शेअर खरेदी करतात. जेव्हा बाजार पुन्हा बुल मोडमध्ये येतो तेव्हा ते प्रचंड नफा कमावतात. हे त्यांच्यासाठी पैसे कमवण्याचं सूत्र आहे. जर तुमचाही या फॉर्म्युलावर विश्वास असेल तर आज अशा 3 शेअर्स बद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकतं.

 

हिंदाल्को इंडस्ट्रीज लि. (Hindalco Industries Ltd) : ICICI Direct ने Hindalco Industries Limited वर Rs 600 च्या टारगेट प्राइस सह खरेदी (Buy) कॉल दिला आहे. सध्या 461 रुपयांच्या करंट मार्केट प्राइसनुसार हा 139 रुपये प्रति शेअर म्हणजे सुमारे 30 % रिटर्न्स मिळवून देऊ शकतो.

 

 दुसरा स्टॉक – अँक्सिस बँक लि. (Axis Bank Ltd) : अँक्सिस बँक लि.च्या शेयर्समध्ये गोल्डमन सॉक्स ने 920 च्या टारगेट प्राइसनुसार खरेदी (Buy) कॉल दिला आहे. मंगळवारी हा शेयर्स राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) 714 रुपयांवर बंद झाला. सध्या 714 रुपयांच्या करंट मार्केट प्राइसनुसार हा शेयर्स 920 पर्यंत जाऊ शकतो. या अर्थाने, प्रति शेअर 206 रुपये किंवा सुमारे 29 % रिटर्न्स दिला जाऊ शकतो.

 

पीईएल (Piramal Enterprises Ltd) : Jefferies ला Piramal Enterprises Limited वर 3,050 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह खरेदी (Buy) कॉल आहे. सध्याच्या 2,596 रुपयांच्या बाजारभावानुसार, 454 रुपये प्रति शेअर किंवा सुमारे 17 टक्के रिटर्न्स दिला जाऊ शकतो.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.