DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सैनिकांचा गौरव

शेंदुर्णी ता.जामनेर ;- आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष पुर्ण झाले असुन त्या निमित्ताने देशाचे लाडके पंतप्रधान ना.नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्व देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आज १५ आँगस्ट मंगळवार रोजी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिलाफलक अनावरण शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शहीद स्तंभावर शेंदुर्णीचे उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करणयात आले.यावेळी राष्ट्रवादी चे नेते संजय गरुड भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल जिल्हा परिषद सदस्या सौ.सरोजिनी गरुड, अमृत खलसे मुख्याधिकारी साजिद पिंजारी नगरसेवक नगरसेविका विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहित जोहरे, सर्कल फड,तलाठी नाईक आप्पा तसेच मान्यवर उपस्थित होते.
नगरपंचायतीच्या आवारात नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.नंतर विरोका वंदन कार्यक्रमात वाजता स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक ,पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना आमंत्रित करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी केले. यामध्ये शहरातील विविध विकास कामांची माहिती देऊन ना.गिरिशभाऊ महाजन यांनी सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समाज मंदिर, मंगल कार्यालय यासाठी जागा व मोठ्या प्रमाणावर निधी दिला असुन विविध विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी मुख्याधिकारी साजिद पिंजारी, अमृत खलसे व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन नगरसेवक निलेश थोरात यांनी तर आभार नगरसेवक सतिष बारी यांनी मानले.यावेळी डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कौमुदी साने,जेष्ठ नेते नारायण गुजर,पोउनि. दिलीप पाटील,सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी, नागरिक, मान्यवर आमंत्रित, पत्रकार तसेच मान्यवर उपस्थित होते.सामुहिक वंन्दे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.गुरुवारी १७ आँगस्ट रोजी शहरातील सर्व प्रभागातील माती जमा करुन कलश तयार करण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी यासाठीसहकार्य करावे असे आवाहन शेंदुर्णीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे उपनगराध्यक्ष गणेश पाटील मुख्याधिकारी साजिद पिंजारी व सर्व नगरसेवक नगरसेविका व नगरपंचायतीच्या कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.