लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्याकडे आलाय.महाराष्ट्रात शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे.प्रचार शिगेला पोहचला आहे.महाराष्ट्रातल्या ४८जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं.त्यातला हा पाचवा टप्पा आहे.या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. राज्यात २० मे रोजी मुंबईतील ६ लोकसभेच्या जागांसह राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यातील प्रचारात मुंबईत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंनी प्रचाराची धुरा संभाळली. तर महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांचा धडाका लावण्यात आला होता. विशेष म्हणजे भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले. राज ठाकरेंनी प्रचार सभा घेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील शेवटच्या या टप्प्यात हायव्होल्टेज लढती होणार आहेत. अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई,उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, वायव्य मुंबई या ६ जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती. मुंबईत काँग्रेस पक्षाकडून २ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर उर्वरित ४ जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार महायुतीशी दोन हात करणार आहेत. महायुतीमध्ये ३ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या. तर उर्वरित तीन जागांवर भाजपने शड्डू ठोकला होता. कल्याणमध्ये ठाकरे सेनेच्या वैशाली दरेकर विरुद्ध शिंदे सेनेचे श्रीकांत शिंदे असा सामना रंगणार आहे. ठाण्यात ठाकरे सेनेचे राजन विचारे विरुद्ध शिंदे सेनेचे नरेश म्हस्के अशी लढत होणार आहे. या दोन्ही लढती शिंदे आणि ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. यासह इतर मतदारसंघात देखील अतितटीचा सामना होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्याकडे आलाय.महाराष्ट्रात शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे.प्रचार शिगेला पोहचला आहे.महाराष्ट्रातल्या ४८जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं.त्यातला हा पाचवा टप्पा आहे.या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. राज्यात २० मे रोजी मुंबईतील ६ लोकसभेच्या जागांसह राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यातील प्रचारात मुंबईत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंनी प्रचाराची धुरा संभाळली. तर महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांचा धडाका लावण्यात आला होता. विशेष म्हणजे भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले. राज ठाकरेंनी प्रचार सभा घेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील शेवटच्या या टप्प्यात हायव्होल्टेज लढती होणार आहेत. अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई,उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, वायव्य मुंबई या ६ जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती. मुंबईत काँग्रेस पक्षाकडून २ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर उर्वरित ४ जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार महायुतीशी दोन हात करणार आहेत. महायुतीमध्ये ३ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या. तर उर्वरित तीन जागांवर भाजपने शड्डू ठोकला होता. कल्याणमध्ये ठाकरे सेनेच्या वैशाली दरेकर विरुद्ध शिंदे सेनेचे श्रीकांत शिंदे असा सामना रंगणार आहे. ठाण्यात ठाकरे सेनेचे राजन विचारे विरुद्ध शिंदे सेनेचे नरेश म्हस्के अशी लढत होणार आहे. या दोन्ही लढती शिंदे आणि ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. यासह इतर मतदारसंघात देखील अतितटीचा सामना होणार आहे.