पोलीस ठाण्याजवळ सुरक्षारक्षकाचा जळालेला मृतदेह आढळला !
जळगाव : शहरातील एमआयडी परिसरात असलेल्या एका बंद कंपनीमध्ये वृद्ध सुरक्षारक्षकांचा मृतदेह सकाळच्या सुमारास जाळतांना आढळून आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून ,घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी हा घातपात आहे की अपघात या दृष्टीने तपासास प्रारंभ केला आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील राम नगरात ईश्वर देवराम अहिरे (वय -६६) हे परिवारासह राहतात. ते आपला उदरनिर्वाह सुरक्षारक्षक म्हणून काम करून भागवीत असतात. दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळ समोरील बाजूस असलेल्या विक्रम प्लास्टिक यांच्या बंद कंपनीत गुरुवारी सकाळी सुरक्षारक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे यांनी गेट उघडताच त्यांना काहीतरी जळत असल्याचे निदर्शनास पडले. त्यांना यावेळी एक व्यक्ती जळत असल्याचे त्यांना आढळून आले. मराठे यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे हे पथकासह पोहचले होते. यावेळी एमआयडीसी पोलिसात शुभम लालसिंग ठाकूर वय-३० यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वर अहिरे यांच्या पत्नीचा देखील जळून मृत्यू झाला होता तसेच काही दिवसापूर्वी त्यांच्या एका नातेवाईकाने देखील आत्महत्या केली. अहिरे यांना दारूचे व्यसन होते तसेच तीन दिवसापूर्वी त्यांचा पगार झाला तेव्हापासून ते कामावर नव्हते. अहिरे यांचा घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली अशा आशयाने तपास सुरू आहे.