DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

व्हॉईस ऑफ मीडिया जळगाव महानगर कार्यकारिणी घोषित

कार्याध्यक्ष - अलोने तर सचिव शुभदा नेवे

जळगाव : व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या देश पातळीवरील संघटनेची जळगाव महानगर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून संघटनेच्या जळगाव महानगर कार्याध्यक्ष पदी हेमंत अलोने तर सचिव पदी शुभदा नेवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
व्हॉईस ऑफ मीडियाच्या जळगाव महानगर कार्यकारिणीची पहिली प्रार्थमिक बैठक नुकतीच झाली. या बैठकीत व्हॉईस ऑफ मीडिया च्या भविष्यातील वाटचाली बाबत चर्चा करण्यात आली. पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांना घरे आणि त्यांच्या पल्यांचे शिक्षण या राष्ट्रव्यापी त्रिसूत्री कार्यक्रमा बाबत उहापोह करण्यात आला. संघटनेच्या महानगर शाखे मार्फत लवकरच सांस्कृतिक आणि प्रशिक्षणात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जेनवाल, जिल्हा कार्याध्यक्ष विकास भदाणे जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे उपस्थित होते. जळगाव महानगरची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जेंनवाल यांनी पुढील प्रमाणे घोषित केली.
व्हॉईस ऑफ मीडिया जळगाव महानगर कार्यकारिणी
 • अध्यक्ष – राजेश यावलकर
 • कार्याध्यक्ष – हेमंत अलोने
 • उपाध्यक्ष – कैलास शिंदे
 • उपाध्यक्ष – अनिल केरहाळे
 • सचिव – शुभदा नेवे
 • सहसचिव – देविदास वाणी
 • कोषाध्यक्ष – सुनील भंगाळे
 • सहकोषाध्यक्ष – संधिपाल वानखेडे
 • प्रवक्ता – आयाज मोहसीन
 • जनसंपर्क प्रमुख – सुभाष पाटील
 • संघटक – विजय पाठक
 • सदस्य – गणेश हिंमत पाटील
 • सतीष जगताप
 • सुभाष वाघ
 • नितीन नांदुरकर
 • सल्लागार – धो. ज. गुरव
 • रवींद्र नवाल
 • शशी वाघ
जळगाव महानगर च्या  नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे व्हॉईस ऑफ मीडिया चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष राजा माने, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पोप्पाला यांनी अभिनंदन केले आहे. सह कार्याध्यक्ष आणि सह प्रवक्ते सह काही महत्वपूर्ण पदांची लवकरच घोषणा करण्यात येईल असेही जिल्हाध्यक्ष उज्जैनवाल यांनी सांगितले.
बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.