जळगावात २६/११ तील वीर शहीदांना आदरांजली
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
जळगाव : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात भारत माते साठी तसेच आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढत वीरगती प्राप्त सर्व शूरवीरांना काव्यरत्नावली चौक जळगाव येथे युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या तर्फे आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी पुष्प वाहून व मेणबत्त्या लावून आदरांजली वाहीली. २६/११ च्या चित्तथरारक प्रसंगांना यावेळी उजाळा देण्यात आला. देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते.
यावेळी महाराष्ट्र एनसीसी 18 बटालीयनचे कमांडींग ऑफिसर कर्नल अभिजीत महाजन, लेफ्टनंट शिवराज पाटील, सुभेदार जहीर अहमद, संदीप कुमार, कंपनी हवालदार मेजर गुलजार अहमद, अरुण कुमार, हवालदार अमोल साळुंखे, सुंदर सिंग, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडीया, प्रितम शिंदे प्रशांत वाणी यश राठोड करण सांडेचा शैलेंद्र राजपूत, तन्मय मनोरे सुरज परदेशी, पियुष हसवाल, सुनील चौधरी, राहूल चव्हाण, संदिप सुर्यवंशी, सोमसिंग पाटील, पियुष तिवारी, सौरभ कुळकर्णी, रवी हसवाल, यश राठोड, देव खाचणे, सुरज परदेशी, ओम पाटील, धनंजय भावसार, यश चौधरी, कुणाल बाविस्कर, आयुष चव्हाण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.