मंगळग्रह मंदिरात रंगला तुळशी विवाह महासोहळा
अमळनेर : भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाह महासोहळ्याला विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाहानंतर वधू-वरांच्या ब्रह्मगाठी विवाह महासोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा कायमस्वरूपी अबाधित राहावी, मंदिरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विवाहेच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराकडे आळवणी करावी, या उद्देशातून मंगळग्रह सेवा संस्थेने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह महासोहळ्याची परंपरा सुरू केली आहे. यंदा महासोहळ्याच्या प्रारंभी वराच्या वेशातील भगवान श्रीकृष्णाची श्री विष्णू अवतारातील मूर्तीची सजवलेल्या रथात व श्री मंगळग्रहाची उत्सवमूर्ती असलेल्या पालखीची मंदिर परिसरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यात महिला-पुरुष भाविकांनी भक्तिमय वातावरणात जल्लोषपूर्ण नृत्य करून आनंद व्यक्त केला.
महासोहळ्यात पूजेस वासुदेवराव देसले (पोलीस निरीक्षक, कोपरगाव), पंकज दुसाने (अध्यक्ष, स्पार्क फाऊंडेशन, अमळनेर), राकेश साळुंखे (संचालक, चैत्राम फूड्स, अमळनेर), पूनम कोचर (संचालक, वसुंधरा साडी सेंटर, अमळनेर), हरिषभाई वाधवानी (माजी नगरसेवक, अमळनेर), डॉ. मिलिंद नवसारीकर (अमळनेर), रोहित पाटील (अमळनेर), सागर कदम (अमळनेर), अॅड. पवार (धुळे) हे नऊ मानकरी होते.
या विवाह महासोहळ्यात वर-वधूच्या मामांची भूमिका चंद्रकांत महाजन व राकेश पाटील यांनी निभावली. विवाह महासोहळ्यानंतर सुमारे पाच हजार भाविकांनी पारंपरिक अस्सल महाराष्ट्रीयन विशेष मेनूचा महाप्रसाद म्हणून आस्वाद घेतला. विशेष म्हणजे पुणे येथील ख्यातनाम वेंकीज कंपनीतर्फे ३०० किलो गावरान तुपातील बालूशाहीचे प्रसाद स्वरूप वाटप करण्यात आले. या विवाह सोहळ्यास माजी आमदार स्मिता वाघ, हरी भिका वाणी,प्रा. रंजना देशमुख,प्रभाकर कोठावदे,अरुण वंजी नेरकर,अॅड. व्ही. आर. पाटील, डॉ. अविनाश जोशी, प्रभाकर कोठावदे, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, महेश कोठावदे, शीतल देशमुख, धनगर दला पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, प्रा. विजयसिंग पवार, विजय मोरे, डॉ. निखिल बहुगुणे , भोजुशेठ माहेश्वरी, मुन्नाशेठ जैन,दिलीप गांधी,वसुंधरा लांडगे , श्याम गोकलाणी,विनोद अग्रवाल आदींची सरोज भांडारकर, माधुरी पाटील, करुणा सोनार,विद्या हजारे आदींची विशेष उपस्थिती लाभली.
ज्येष्ठ पुरोहित केशव पुराणिक व मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना पुजारी तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी व मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, सारंग पाठक, निलेश आसोदेकर, अथर्व कुलकर्णी, व्यंकटेश कळवे यांनी सहकार्य केले. स्वाती चौधरी यांनी वधू राणी श्री तुलसीदेवी यांचा आकर्षकपणे साजशृंगार केला.
महासोहळा यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी आशा महाले, उज्वला शहा, विनोद कदम, आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, आनंद महाले, स्वाती महाले, जी. एस. चौधरी, उमाकांत हिरे, गोरख चौधरी, पुषंद ढाके, एम. जी. पाटील, जे. व्ही. बाविस्कर, राहुल पाटील, आशिष चौधरी, सुबोध पाटील, विशाल शर्मा आदींनी परिश्रम घेतले.
वरुणराजानेही लावली हजेरी : श्री तुलसी विवाह महासोहळ्याप्रसंगी साक्षात वरुणराजानेही आशीर्वादपर जोरदार हजेरी लावली. याप्रसंगी ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटासह नैसर्गिक आतषबाजीही झाली. त्यामुळे उपस्थित भाविकांना जणू वरुणराजाचाही या मंगल विवाह महासोहळ्यास उपस्थिती लाभल्याची अनुभूती आली. तसेच काहींना चिंब भिजण्याचाही मोह आवरता आला नाही.