MPSC क्लर्क परिक्षेत 3 गुण कमी मिळाल्याने शिरसोलीच्या तरूणाची आत्महत्या
शिरसोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल ‘मंत्रालय लिपीक’ या पदासाठी मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील तरूणाला या परिक्षेत 3 गुण कमी मिळाल्याने त्याने गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री 8 वाजता घडली. असे आकाश भीमराव बारी (वय 25) असे मृत तरूणाचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश बारी हा तरूण गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परिक्षांची तयारी करत होता. मात्र, स्पर्धा परिक्षांमध्ये त्याला सातत्याने अपयश येत होते. दरम्यान, काल राज्य सेवा आयोगाकडून मंत्रायल लिपीक पदाचा मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये आकाशला तीन गुणी कमी मिळाल्याने त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
भावाला बसला धक्का –
आकाशाचा मोठा भाऊ हा कंपनीतून घरी आल्यानंतर त्याला आकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, आकाशला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आकाशच्या पश्चात आई, मोठा भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे.