जळगाव हादरलं! हॉटेलात जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून
जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर सोनवणे (वय-३३) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी २२ मे रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत किशोर अशोक सोनवणे (वय-३३, रा. बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ, जळगाव) हा परिवारासह वास्तव्याl आहे. कालिका माता मंदिराजवळील हॉटेल भानू येथे किशोर सोनवणे हा जेवण करण्यासाठी बसलेला होता. काही अज्ञात हल्लेखोरांनी किशोर सोनवणे याच्यावर 22 रोजी च्या रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. किशोर सोनवणे काही जणांसोबत जुना वाद होता. या वादातूनच हा खून झाला असावा. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र इतर मारेकरी फरार होण्यात यशस्वी झाले असल्याने त्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. हॉटेल इतक्या रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे कारण काय? तसेच रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यपान करणे परवानगी कोणाकडून देण्यात येत होती? अशा विविध प्रश्नांचा ससेमिरा लागला असून रात्री उशिरापर्यंत मद्यपानास परवानगी दिली कोणी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता. तसेच या खून प्रकरणात अजून किती जणांचा समावेश आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
असा झाला खून…
किशोर सोनवणे काही जणांसोबत जुना वाद होता. या वादातून हॉटेल भानू येथे किशोर सोनवणे हा जेवण करण्यासाठी बसलेला असतांना अज्ञात काही हल्लेखोरांनी किशोर सोनवणे याच्यावर बुधवारी २२ मे रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. किशोर सोनवणे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.