लिटिल नेस्ट माय छोटा स्कूलमध्ये महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
जामनेर : जामनेर येथील क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित,लिटिल नेस्ट माय छोटा स्कूलमध्ये हळदी कुंकू वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ.केतकी राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. कार्यक्रमात जामनेर शहरातील सर्व महिलांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले होते. मोठ्या प्रमाणात महिला वर्ग या कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका सौ.दिपाली येणे,नयना पाटील तसेच अन्य कर्मचारी वर्गांचे सहकार्य लाभले असून हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यात आला.