DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आता तुरुंगातील महिलाही करू शकणार डेटिंग; अनोख्या ऑफरची रंगली चर्चा…

नवी दिल्ली : टरनेटच्या उपलब्धतेमुळे जीवनात सहजता आलेली आपण पाहतो. पण या सहजतेने नेहमी फायदाच होईल असे नाही यातून अनेक समस्या सुद्धा निर्माण होतात. समस्यांचे निराकरणदेखील यातूनच होते. सोशल मीडियामुळे कधी काय होईल हे कल्पनेपलीकडचे आहे. यातून मनोरंजनाच्या गोष्टीसुद्धा भरपूर व्हायरल होतात.

सध्या महिला कैद्यांबाबत दिलेल्या एका ऑफरची चर्चा भरपूर प्रमाणात चालत आहे. महिला कैद्यांच्या समस्या आहेत, तितकेच त्यांनी यशाचे शिखर सुद्धा गाठले आहेत. रेडिओ जॉकी सारख्या अनेक पदावर महिला कैदी आघाडीवर आहेत. देशात कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी याकरिता अनेक सुविधा ऑफर्स दिल्या जातात.

 

त्यापैकी एक म्हणजे डेटिंग वेबसाइट. जेलमध्ये बंद असलेल्या कैद्यांचे भविष्य सुधारण्यासाठी त्यांना डेट करण्याची संधी दिली जात आहे. याशिवाय अनेक वेबसाइटसुद्धा सोशल मीडियावर कार्यरत आहेत. ज्या दोन लोकांना एकत्रित आणण्याचे काम करत असतात. ही ऑफर ‘Women Behind Bars’ या वेबसाइटने दिली आहे. या वेबसाईटचं विशेष म्हणजे ही खासकरून महिला कैद्यांना डेटिंग करण्यासाठी बनवण्यात आली आहे.

महिला कैद्यांना रिलेशनशीप मध्ये राहता यावं याकरिता बनवण्यात आलेल्या या वेबसाईटचे म्हणणे आहे की, जेव्हा कैदी तुरुंगातून बाहेर येतात. तेव्हा त्यांना त्यांचे आयुष्य नव्या पद्धतीने जगायचे असते आणि जुन्या सवयी बदलायच्या असतात. जेणेकरून त्यांना पुन्हा तुरूंगात जावे लागणार नाही. याची सुरक्षित बाब म्हणजे या वेबसाईट सुविधेचा वापर करून महिलांना कुठेही जाण्याची परवानगी मिळणार नाही. शारीरिक डेटिंग करता येणार नाही.

पत्राद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहता येईल. यासाठी अतिशय कमी शुल्क आकारण्यात आले आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून सुरक्षित रिलेशनशिपमध्ये महिला कैदी राहू शकतील. जुन्या सवयी बदलण्याकरिता एक विरंगुळा म्हणून किंवा आयुष्याची नवीन सुरूवात म्हणून या वेबसाईटचा उपयोग त्यांना होऊ शकतो. महिला कैदी आतापर्यंत अनेक क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. त्यांनी आयुष्याची नवीन सुरूवात सुद्धा केली आहे.

परंतु, या वेबसाईटमुळे बाहेर आल्यानंतर एक चांगला जीवनसाथी मिळून त्यांच्या आयुष्याला कलाटणी सुद्धा मिळेल. या वेबसाईटला सुरक्षितता असल्याने कैदी महिला याचा वापर करू शकतात. या विशेष वेबसाईटचा महिला कैदी कसा वापर करतात यावरसुद्धा त्यांची सुरक्षितता अवलंबून राहील.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.