DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळण्यासाठी आज तीन हजार शिवसैनिक मुंबईत शक्ती प्रदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घालणार साकडे

पाचोरा ✍🏻 प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून अपक्ष १० आमदारांसह ५० आमदार सोबत घेऊन वेगळा गट तयार केला असतांना त्यावेळी या गटात सर्वप्रथम पाचोरा – भडगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे सामिल झाले होते. यानंतर राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागली. पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांचे नंतर सतत दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी महाविकास आघाडीचे सरकार असतांना आमदार किशोर पाटील व तात्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय जवळीक संबंध प्रस्थापित झाले होते. दरम्यान आमदार किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचे कडून गेल्या दोन वर्षांत सुमारे ८० कोटीचे विकास कामे खेचून आणली होती याच दोन वर्षात एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांचे निवस्थानी गुप्तपणे येवून तब्बल पाचवेळा भेटी दिल्या होत्या. मात्र आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने त्यांचेकडून आमदार किशोर पाटील व पाचोरा भडगाव तालुक्यातील नागरीकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत कदाचित यामुळेच आमदार किशोर पाटील यांना किमान राज्यमंत्री का होईना याची आपेक्षा व आशा आमदार किशोर पाटील यांचे समर्थकांना लागल्या आहेत.
आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळण्यासाठी आज रविवारी दि. १७ रोजी पाचोरा भडगाव तालुक्यातील सुमारे तीन हजार समर्थक शिवसैनिक मुंबई येथे जाणार असून या साठी पाचोरा व भडगाव शहरातील प्रत्येक प्रभातून ३ ते ४ क्रुझर व दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील समर्थकांसाठी वेगळी वाहनाची व्यवस्था केलेली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मुंबई येथे जाणाऱ्या शिवसैनिकांसाठी सकाळी पाच वाजता कृष्णापूरी येथील समर्थ पेट्रोल पंप व भडगाव रोडवरील श्री गजानन पेट्रोल पंप तर भडगाव येथील शिवसैनिकांसाठी भडगाव बसस्थानका पासून व्यवस्था केलेली असल्याचे वृत्त आहे. दि. १७ जुलै रविवारी दुपारी ३ वाजत यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्व समर्थक जमणार असून तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचोरा मतदार संघातर्फे भव्य सत्कार व आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळण्यासाठी शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे,राज्यातील मंत्रीमंडळाचा १९ ते २१ जुलै दरम्यान खाती वाटप केले जाणार आहे मात्र यावेळी केवळ १० मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे, मंत्रीमंडळाचा पावसाळी अधिवेशना नंतर विस्तार केला जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने किमान दुसऱ्या यादीत आमदार किशोर पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांचे समर्थकांना आहे.

 

पाचोरा – भडगाव पालिकेतील सर्व नगरसेवक आमदार पाटील यांचे सोबत
राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच वेगळा गट स्थापन झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पाचोरा व भडगाव पालीकेत शिवसेनेची सत्ता होती यात पाचोरा पालीकेतील नगराध्यक्ष व सर्वच्या सर्व ११ नगरसेवक व भडगाव येथे सर्व नगरसेवकांनी व इच्छुक उमेदवारांनी आमदार किशोर पाटील यांना पहिल्या दिवसापासून समर्थन दिले आहे ते सर्व माजी नगरसेवक आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळण्यासाठी मुंबई येथे दाखल होणार आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.