DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आरोग्य सेवेसाठी आदर्श निर्माण करणाऱ्या विभूतींचा निमा संघटनेकडून धन्वंतरी पुरस्कार

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे आरोग्य सेवेसाठी समर्पित आयुष्य जगत असतांना आपल्या सेवा कार्यातून ज्यांनी समाजात आदर्श निर्माण केला अश्या विभूतींना जामनेर तालुका निमा संघटनेकडून धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जिनिस पोद्दार इंग्लिश मीडियम स्कुल च्या सभागृहात धन्वंतरी सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.होते. ●पुरस्कार सन्मान सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी जामनेर तालुका निमा चे अध्यक्ष-डॉ.नंदलाल पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.के. पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी-डॉ.राजेश सोनवणे,आय एम.ए.चे अध्यक्ष-डॉ.संदीप पाटील,जामनेर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष- डॉ.चंद्रशेखर पाटील,होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष-डॉ.राजेंद्र ललवाणी,आय डी ए च्या डॉ.सुषमा पाटील,माजी अध्यक्ष-डॉ.प्रशांत भोंडे, माजी अध्यक्ष-डॉ.संजीव पाटील हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. डॉ.पंढरीनाथ बसेर,डॉ.एम.बी.चौधरी, डॉ.एस.डी.महाजन,डॉ.स्नेहांकीता लोखंडे, डॉ.व्ही.के.पाटील या मान्यवरांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व धन्वंतरी प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जामनेर तालुका निमा चे सचिव-डॉ.राहुल वाणी यांनी केले सूत्रसंचालन डॉ.नरेश पाटील,डॉ.निवेदिता पाटील,यांनी केले तर आभार डॉ.पराग पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.विनोद भोई,डॉ.पियुष ओस्तवाल,डॉ.प्रशांत पाटील, डॉ.निलेश पाटील,डॉ.विजया पाटील,डॉ.स्वाती विसपुते,डॉ.रविंद्र बडगुजर,डॉ.सुरजसिंग पाटील, डॉ.जगदीश पाटील,डॉ.भगवान बैरागी,डॉ.अनिल पाटील,डॉ.विश .भगवान बैरागी,डॉ.अनिल पाटील,डॉ.विशाल पाटील,डॉ.जितेंद्र घोंगळे आदी कार्यकारणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.