DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशर्स फ्रेन्झी पार्टी उत्साहात

जळगाव – शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकताना मुलांचा एका नव्या जगात प्रवेश होत असतो. कॉलेज लाईफ मध्ये प्रवेश करताना मुलं काहीशी बावरलेली असतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजची तसेच सीनियर्सची ओळख व्हावी, यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स फ्रेन्झी या फ्रेशर पार्टीचे दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव ( रजिस्ट्रार), डॉ .नितीन भोळे(प्रमुख,बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटी), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), डॉ.अनिलकुमार विश्वकर्मा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विभाग प्रमुख) महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सादर करावी, जेणेकरून तुमच्या व्यक्तीमत्वात प्रगल्भता येईल. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून परस्पर संबंध व सर्वांगीण विकास वाढत असल्याचे ते म्हणाले. दिवसभराच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये विद्यार्थ्यांचे सुप्तगुण, आत्मविश्वास तसेच त्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी या पद्धतीने वेगवेगळ्या राऊंड्सचे आयोजन करण्यात आले होते.

यात मुख्यत: पहील्या फेरी मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या बाऊलमधून चिठ्ठी काढून त्यात दिलेले टास्क पूर्ण करायचे होते. फिश बाऊल च्या फेरीत पहिल्या वर्षाच्या सर्व मुला- मुलींनी अतिशय आनंदाने सहभाग नोंदवला. तद्नंतर दुसर्‍या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रॅम्प वॉक करून काही प्रश्नांची उत्तरे देऊन आपले शारीरीक तसेच बौध्दीक कौशल्य दाखवायचे होते.त्यानंतर अंतिम फेरी मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना अवगत असलेली कला सादर करायची होती. फेस ऑफच्या या फेरीत विद्यार्थ्यांनी डान्स, सिगिंग, मिमिक्री अश्या वेगवेगळ्या कला सादर केल्या. आणि या व सर्व फेरीमधुन मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर यांची निवड करण्यात आली यात मिस्टर फ्रेशर म्हणुन गणेश कोलते व मिस फ्रेशर म्हणून सानिका कासार हे विजेते ठरले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रुती सोनार, चेतन बाविस्कर, प्राची गिरासे, श्वेता बोरसे, चंचल पाटील, अक्षता भोळे, कुणाल बागुल, जय खडसे, प्रथमेश पवार, श्रुती देशमुख, दुर्गेश सोनार, सेजल सातव, दीक्षा रामराजे, हर्षाली मोरे, नम्रता संगिले, स्वामी पवार, वैष्णवी पिंगळे व साक्षी बारी यांनी केले. तसेच कार्यक्रमा वेळी परीक्षक म्हणून प्रथम फेरीसाठी प्रा. हेमंत नेहेते, प्रा.मयूर ठाकूर, द्वितीय फेरीसाठी प्रा.अतुल बर्‍हाटे, तृतीय फेरीसाठी प्रा. देवपाल यादव, प्रा. देवेंद्र फेगडे व अंतिम फेरीसाठी प्रा. हेमंत इंगळे प्रा.सरोज भोळे, प्रा. तुषार कोळी प्रा. शफिकुर रहमान यांनी सहकार्य केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना प्रा.अमित म्हसकर, डॉ. नितीन भोळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे प्रथम वर्षाच्या सर्व प्राध्यापक वर्गाचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने व उत्साहाने सहभाग नोंदवला व भरघोस प्रतिसाद दिला.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.