DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

एटीएम कार्डची अदलाबदली;फसवणूक केल्याची घटना

नाशिक:

एटीएम कार्डची अदलाबदली करून दोनजणांनी विविध एटीएम सेंटरमधून ७० हजार ६२३ रुपये काढून घेत एकाची फसवणूक केल्याची घटना वडनेर पाथर्डी रोडवर, सप्तशृंगी हॉस्पिटलजवळील एटीएम सेंटरमध्ये घडली. याप्रकरणी कैलास युवराज पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कैलास पाटील वडनेर पाथर्डी रोडवर, सप्तशृंगी हॉस्पिटलजवळील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढत होते. त्यावेळी अनोळखी दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांची नजर चुकवून एटीएमची अदलाबदली केली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ७० हजार ६२३ रुपये काढून घेतले. संशयितांनी अंबड शाखेतील एटीएममधून तीन टप्प्यात काढलेले १८ हजार रुपये, डेक्कन ऑटोमोबाईलमध्ये दोन टप्प्यात १५ हजार रुपये, आडगाव शाखेतून ७ हजार २३ रुपये काढून घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.