DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

जालना : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ७ जणांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ काल रात्री ११ वाजताच्या सुमारास दोन गाड्यांचा भीषण अपघात झाला. नागपूरहून मुबंईकडे जाणाऱ्या गाडीला डीझेल भरून समोरून येणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्या समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४ ते ५ जण गंभीर झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी देखील झाली होती.

 

स्थानिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने दोन्ही गाड्या बाहेर काढल्या. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना गाड्यांमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं जात आहे. या अपघाताबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर गटाचे आमदार रोहित पवार यांनी समृद्धी महामार्गावर या भीषण अपघाताबाबत त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात होऊन यात सात जणांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि अत्यंत दुःखद आहे. मृत्यू झालेल्या या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे प्रवाशी जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा! या मार्गावर वारंवार अपघात होऊन त्यात निरपराध लोकांचा बळी जात असल्याने सरकारने सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.