DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गहना वशिष्ठ म्हणाली – तुरुंगातील आठवणी अन् जीवनावर बनवणार बायोपिक

अभिनेत्री गहना वशिष्ठ पॉर्न चित्रपट रॅकेट प्रकरणात या फेब्रुवारीपासून कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे.

अभिनेत्री गहना वशिष्ठ पॉर्न चित्रपट रॅकेट प्रकरणात या फेब्रुवारीपासून कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. याच प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला देखील अटक झाली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

गहना सांगते, ‘मी जवळजवळ पाच महिने तुरुंगात राहिली. त्यातील 17 दिवस कोरोना सेंटरमध्येही राहिले. एखा खोलीत आम्ही 50 ते 55 लोक राहात होतो. तेथे दिवसरात्र महिला आपापसांत भांडण करायच्या. तू काय केलेस असे त्या मला विचारायच्या. तेव्हा मी काय गुन्हा केलाय, याचे उत्तर माझ्याकडे नसायचे. मी त्यांना सांगायचे, सेटवर एका मुलीवर बलात्कार होताना मी पाहिल्याचा आरोप माझ्यावर लागला आहे. त्यावरुन त्या मला हसायच्या. सेटवर कधी रेप होतो का? काहीतरी गमंत करताय? असे त्या मला म्हणायच्या.’

गुणवत्तेच्या आधारे मला जामीन मिळाला:

गहनाने पुढे सांगितले, ‘माझे वडील भेटायला मला तुरुंगात आले होते. ते वकील आहेत. भेटताच त्यांनी सांगितले होते, कोणताही खटला होत नाहीये. काळजी करु नको, तू लवकरच सुटशील. त्यानंतर मला गुणवत्तेच्या आधारावर जामीन मिळाला. कारण त्यांना माझ्याविरुद्ध पुरावे सापडले नाहीत.’

मी तुरुंगात ब-याच स्क्रिप्ट लिहिल्या:

गहनाने सांगितल्यानुसार, ‘आयुष्यात जे-जे पाहिले, त्यावर बायोपिक बनवण्याचा विचार सुरु आहे. संस्थापक आणि मोठे निर्मातेही मिळाले आहेत. मला तुरुंगात ब-याच महिलांनी त्यांचे दुःख सांगितले. त्यापैकी 19 स्त्रियांच्या स्क्रिप्ट मिळाल्या, त्यांच्यावर एक लघुपट बनवणार.’

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.