DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गारखेडा बु!! येथे अंत्योदय अन्न योजनेचा व प्राधान्य कुटुंब योजने मार्फत शिधाधारकांना दिवाळी भेट

गारखेडा बु/प्रतिनीधी-सुनिल चौधरी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष व लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुर दृष्टी राज्यभरातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना या शिधाधारकांना दिवाळी आनंदाची व गोड जावी यासाठी शिधाधार कुटुंबाला चना दाळ १ किलो, रवा १ किलो, साखर १ किलो , पामतेल १ लिटर असा ऐकून शिधा शंभर (१००₹ ) रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पात्र शिधा धारकांना गारखेडा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित श्री प्रकाश माणिकराव पाटील, व गारखेडा खुर्द चे सरपंच श्री माधव महाजन,विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप सुखदेव चौधरी, तसेच विकास सोसायटी स्वस्त धान्य दुकानाचे सेल्समन यांच्या हस्ते शिधाधारकांना धान्य किट वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.