गारखेडा येथील महादेव मंदिर व पर्यटन स्थळाला मा. कलेक्टर अभिजीत राऊत यांची सदिच्छा भेट
जामनेर | प्रतिनीधी-शांताराम झाल्टे
वाघुर धरणाच्या जलसाठ्याच्या मधोमध 22 एकराचे बेट आहे या बेटावर , बॅकउड इमरलँड ,नावाने पर्यटन स्थळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी तयार करण्यात येत आहे.
या जहाज मधे 9 बांबू हाऊस आहेत.
प्रवेशद्वारा वर भगवान शंकराची महाकाय मूर्ती साकारण्यात येत आहे.
मा. कलेक्टर श्री. अभिजीतजी राऊत साहेब, अधिक्षक अभियंता श्री प्रशांतजी सोनवणे साहेब, तहसीलदार श्री. अरूण शेवाळे साहेब, उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम जामनेर श्री .आर. डी पाटील साहेब , व मा. सरपंच श्री अशोक भाऊ पाटील यांनी कलेक्टर साहेबांचे शाल,गुच्छ देऊन स्वागत केले व यांनी पर्यटन स्थळाला सदिच्छा भेट दिली
व आज पासून पर्यटकांसाठी पर्यटन स्थळ खूले करण्यात आले असून पर्यटकांनी मनसोक्त आनंद लाभ घ्यावा.