DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गूगलचे नवीन फीचर भारतात लॉन्च !

मुंबई : गूगल (Google) नवी फीचर आणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. गूगल मॅप्सने अखेर गूगल स्ट्रीट व्ह्यू फीचर भारतातही लॉन्च केले आहे. हे फिचर वर्षाअखेरपर्यंत देशातील 50 शहरांमध्ये सुरु करण्याची गूगलची योजना आहे. आता हे मुंबई, पुणे, आणि नाशिक शहरात सुरु करण्यात आले आहे.

काय आहे गूगल स्ट्रीट व्ह्यू फीचर
आपण गूगलचा (Google) आधार घेत रस्ते आणि मार्ग शोधत असतो. गाडी चालवताना याचा खूप लाभ होतो. Google स्ट्रीट व्ह्यूव हे एक अद्यावत तंत्रज्ञान आहे. Google नकाशे आणि Google Earth अ‍ॅपद्वारे जगातील अनेक रस्त्यांवरील स्थानांवरुन परस्पर पॅनोरामा प्रदान करण्यास मदत करते. सर्वातआधी 2007 मध्ये अनेक यूएसमधील शहरांमध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर आता जगभरातील शहरे आणि ग्रामीण भागांचा समावेश करण्यासाठी त्याचा विस्तार केला जात आहे.

 

कंपनीने 15 वर्षांपूर्वी अमेरिकेत हे फिचर लॉन्च केले होते. या फिचरमुळे वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे या सुविधेचा आनंद घर बसल्या घेता येणार आहे. ज्या रस्त्यांचे फोटो Google Maps मध्ये उपलब्ध आहेत ते निळ्या रेषेत दाखवण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्यांव्यतिरिक्त, या ठिकाणी जागतिक लँडमार्क, संग्रहालये तसेच रेस्टॉरंट्स देखील पाहण्यासाठी तुम्ही गूगल मॅप्समधील स्ट्रीट व्ह्यू फीचरचा वापर करु शकता.

Google Street View फिचर
गूगल स्ट्रीट व्ह्यू फीचर सध्या देशातील 10 शहरांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार असून, प्रायोगिक तत्त्वावर याची पहिल्यांदा सुरुवात बंगळुरु येथे सुरु केले जाणार आहे. त्यानंतर दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, वडोदरा, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आणि अमृतसर या शहरांमध्ये याची सुरुवात केली जाणार आहे. या दहा शहरांमध्ये सुमारे 1,50,000 किलोमीटरचा परीसराचा समावेश करण्यात आलाय.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.