DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गोंडगाव येथील घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांतर्फे सोमवारी पाचोरा बंद

पाचोरा ;- भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका ८ वर्षीय चिमुकली वर १९ वर्षाच्या नराधमाने अत्याचार करत चिमुकली खुन केल्याची दुर्दैवी घटना घडली असुन आरोपी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीस कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फासावर लटकवा. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या निंदनीय घटने प्रकरणी पाचोरा येथील महापुरुष सन्मान समितीने आक्रमक भूमिका घेत ७ आॅगस्ट सोमवारी सकाळी ८ वाजेपासून पाचोरा शहर कळकळीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय ४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता येथील हुतात्मा स्मारकात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना ७ आॅगस्ट रोजी पाचोरा बंद संदर्भात निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी स्विकारले.

 

या प्रसंगी महापुरुष सन्मान समितीचे अध्यक्ष व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, महापुरुष सन्मान समितीने कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे, वंचित बहुजन आघाडीचे मा‌जी.ता. अध्यक्ष अनिल लोंढे, मा. नगरसेवक अशोक मोरे, निखिल परमार, संतोष कदम, संदिप गाडेकर, विनोद पाटील, सुनिल पाटील, जितेंद्र राठोड, रविंद्र कोळी, प्रविण पाटील, अनिल पाटील, प्रविण मगर, शरद पाटील, रोषण राठोड,चेतन सपकाळे, विश्वास पाटील, लोकेश चौधरी, कुंदन देसाई, खुशाल खैरनार, महेंद्र पाटील, गंगाराम तेली, राज भोई, दिनेश ठाकुर उपस्थित होते. पाचोरा बंद ला बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांचेसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी आपला पाठिंबा दर्शवित. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान देखिल महापुरूष सन्मान समोरच्या माध्यामातून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.