DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

ग्रामसभा न घेणे हा शासनाचा चुकीचा निर्णय – रवि पाटील प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुका अध्यक्ष अमळनेर

अमळनेर :- (प्रतिनिधी- नूर खान)ग्रामसभा न घेणे हा शासनाचा चुकीचा निर्णय – रवि पाटील प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुका अध्यक्ष अमळनेर
संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या वर्षी पासुन कोरोनाचा हाहाकार घातला आहे . यामुळे लाँकडाऊन सारखा पर्याय घ्यावा लागेल . याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला त्यानंतर आता कुठे परिस्थिती पुर्वपदावर येऊ लागली आहे . पण सध्या कोव्हीड 19 जाऊन ओमीक्रॉनचे सावट निर्माण झाले आहे . सध्या फक्त शाळा सोडून इतर सर्व सुरू आहे . कोरोनामुळे गावातील विकास कामांना मोठी खिळ बसली आहे . त्यात कोरोनाच्या पाश्चवँभुमीशर गेल्या वर्षभरात ग्रामसभा न झाल्यामुळे लोकांना निश्चित गावगाडयात काय चालले आहे . गावासाठी किती विकास निधी आला कोणत्या कामावर किती निधी खर्च झाला . याची निश्चित माहीती गावातील नागरिकांना मिळाली नाही . गावातील कारभार कसा चालला आहे . निश्चित गावातील आपल्या प्रभागातील ज्या काही अडचणी असतील त्या ग्रामसभेत मांडता येतात पण आँनलाईन पध्दतीने ग्रामसभा घेतल्यानंतर किती लोकांना आपल्या अडचणी मांडता येतील . अगदी बोटावर मोजण्या एवढया लोकांना सुध्दा यामध्ये सहभागी होता येणार नाही किंवा आपल्या अडचणी मांडता येणार नाहीत . मंदिरे , बार , बाकी सर्व सुरू आहे मग फक्त ग्रामसभेला गर्दी चालत नाही का . शासनाचा हा निर्णय अतिशय र्दुदैवी असल्याचे मत अमळनेर प्रहार जनशक्ती युवक तालुका अध्यक्ष रवि पाटील यांनी व्यक्त केले
नुकत्याच नगरपालिका , नगरपंचायत , ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका झाल्या.तसेच पाच राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत . त्याठिकाणी गर्दी होणार नाही का मग ग्रामसभेला च गर्दी होते म्हणून रद्द करणे अयोग्य आहे .

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.