DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

घराच्या खोदकामात आढळले पुरातन शिक्के व सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जप्तजळगाव कासोदा येथील घटना…

घराच्या खोदकामात आढळले पुरातन शिक्के व सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जप्त
जळगाव कासोदा येथील घटना…

जळगाव : जुन्या पडक्या घराचे खोदकाम सुरु असतांना मिळालेले पुरातनकालीन सोन्याचे दागिने व चांदीचे शिक्के जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत. नाशिकच्या पुरातत्व विभागाच्या स्वाधिन करण्यासाठी ते दागिने नजिकच्या कासोदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

एरंडोल तालुक्यातील कासोदा या गावी ताराबाई गणपती समदानी यांचे जुने पडके घर आहे. या घराच्या पुनर्निर्मीतीसाठी खोदकाम सुरु होते. या खोदकामादरम्यान पुरातन काळातील सोन्याचे दागिने व चांदीचे शिक्के कामगारांना आढळून आले. या घटनेची वार्ता गावपरिसरात वा-यासारखी पसरण्यास वेळ लागला नाही. याबाबत पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने आपल्या वरिष्ठ अधिका-यांसह एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना पुढील कारवाईचे आदेश दिले. पो.नि. किरणाकुमार बकाले यांनी सहा.पो.निरीक्षक जालिंदर पळे, पोउनि. अमोल देवढे, सफौ वसंत ताराचंद लिंगायत, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना नंदलाल दशरथ पाटील, पोना भगवान तुकाराम पाटील, पोना राहुल मधुकर बैसाणे, पोकॉ सचिन प्रकाश महाजन, चापोकॉ अशोक पाटील, मुरलीधर बारी आदींना घटनास्थळी रवाना केले.

घटनास्थळावर जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव (32) मुळ रा.बरही जि.गाजीपुर (उत्तर प्रदेश) हल्ली रा.कासोदा ता.एरंडोल, ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे (50) रा.कासोदा ता.एरंडोल, ट्रॅक्टर चालक संजय ऊर्फ सतिष साहेबराव पाटील (35) रा.कासोदा ता.एरंडोल, ट्रॅक्टर चालक राहुल राजु भिल (24) मुळ रा.बोरगाव ता.धरणगाव हल्ली रा.कासोदा ता.एरंडोल हे आढळून आले.एलसीबी पथकाने घटनास्थळावरील चौघा कामगारांची सखोल विचारपूस केली. पडक्या घराच्या खोदकामादरम्यान पुरातनकालीन सोन्याचे दागिने व चांदीचे शिक्के मिळून आल्याचे त्यांनी पथकाला सांगत काढून दिले. दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. मिळालेला एवज हा सन 1905 ते 1919 या कालावधीतील असल्याचे स्पष्ट झाले. या दागिन्यांचे आजचे बाजारमुल्य सराफाकडून तपासले असता ते 19 लाख 17 हजार 283 रुपये एवढे असल्याचे निष्पन्न झाले. सर्व ऐवज नाशिकच्या पुरातत्व विभागाच्या स्वाधीन केला जाणार असल्याचे पोलिस विभागकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान सर्व ऐवज हा कासोदा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.