DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जलसंधारण, पर्यावरण रक्षणाची गरज- अरिफ शेखजैन इरिगेशनमध्ये जलसाक्षरता शिबीर संपन्न


जळगाव दि.22 प्रतिनिधी – जैन इरिगेशन कंपनी पाणी बचत, संवर्धनासाठी काम करणारी जगविख्यात कंपनी आहे. जैन इरिगेशनच्या पाणी बचतीविषयी कार्याप्रमाणे सध्याच्या परिस्थितीत जलसंधारण व पर्यावरण रक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अरिफ शेख यांनी केले.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क येथे “जलसाक्षरता शिबीर” आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे प्रमुख वक्ते अरिफ शेख, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश जळगाव हे उपस्थित होते. त्यांचे स्वागत जैन इरिगेशन सिस्टिम्सचे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष व्ही. एम. भट यांनी केले. जलसंधारण शिबिराची प्रस्तावना जैन इरिगेशनच्या कार्मिक विभागाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक यांनी मांडली.
संपूर्ण जगामध्ये पाण्याचे नियोजन आणि बचतीचे तंत्रज्ञान कसे असावे ह्याचे उत्कृष्ट उदाहरण जैन इरिगेशन येथे पाहण्यास मिळते असे अरिफ शेख म्हणाले. जलसंधारणात जैन इरिगेशनचे योगदान ह्यावर बोलतांना अरिफ शेख यांनी सांगितले कि, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गावे दत्तक घेऊन तेथील लोकांना पाणी बचतीचे महत्व सांगून जलसंधारणाचे अनेक उपक्रम हाती घेतल्याचा उल्लेख त्यांनी केले. त्यातूनच समाजामध्ये पाण्याविषयी जागरूकता निर्माण केली जाते. त्याचप्रमाणे जिल्हा विधी व न्याय विभागाचे काय काम असते ते कशा पद्धतीने चालते व जनतेच्या अडचणी कशा प्रकारे सोडविल्या जातात याबाबत अरिफ शेख यांनी माहिती दिली. आभार चंद्रकांत नाईक मानले.
फोटो कॕप्शन – जलसाक्षरता शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना अरिफ शेख सोबत व्ही. एम. भट, चंद्रकांत नाईक.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.