DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावकरांना दिलासा! जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही

जळगाव । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कोरोना अहवालात पहिल्यांदा आज दिवसभरात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर ६ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कारोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६१३ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख्‍ ३९ हजार ९८२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५६ बाधित रूग्ण जिल्ह्यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण २ हजार ५७५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.