DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात पोलिसांची लॉजवर रेड, आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या १३ मुलींनी केला धक्कादायक दावा…

जळगाव | प्रतिनिधी 

जळगावमध्ये पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १३ जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईने जळगावमध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्यामुळे ही जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली आहेत.

जळगावच्या शहर भागात असणाऱ्या दोन लॉजवर पोलिसांनी छापे टाकले. एका लॉजवर तीन मुले व तीन मुली सापडल्या आहेत. तसेच दुसऱ्या लॉजवर १० जोडपी पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दलालांमार्फत मुली पुरवण्याचे काम या ठिकाणी होत होते. पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलींनी मात्र याबाबत वेगळीच माहिती दिल्याचे समोर येत आहे.

आपण आपल्या मर्जीने या ठिकाणी आलो, असा दावा मुलींकडून करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे ही तरुण मुलं-मुली आता अडचणीत सापडली असल्याचे दिसते.

यातील काही मुली महाविद्यालयात शिक्षण घेत असून काही मुली परप्रांतीय आहेत. मात्र आता जळगावमध्ये स्थायिक झालेल्या आहेत. शहरातील परिसरात अनैतिक प्रकार घडत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र यादरम्यान एका मुलीला दलालाने आणल्याचे उघड झाले आहे. तर मुलींनी मात्र आपण स्वतःच्या मर्जीने आलो आहोत असे पोलिसांना सांगितले. घटनास्थळाची पूर्ण तपासणी करून पोलीस अटक केलेल्या व्यक्तींची कसून चौकशी करत आहेत.

मुंबईतील दोन महिलाही लॉजमध्ये असल्याचे आढळून आल्याची चर्चा आहे. वैश्या व्यवसायात महाविद्यालयीन मुली मिळुन आल्यामुळे पोलिसही चक्रावले आहे. दरम्यान, या प्रकरणी हॉटेल सागरचे मालक सागर नारायण सोनवणे (रा. जळगाव), सागर सुधाकर पाटील,श्याम पूर्ण नाव माहित नाही आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच हॉटेल हेरंब पॅलेसचे मालक पंकज वासुदेव बोरोले व व्यवस्थापक लोकेश राजेंद्र शिंदे या दोघांविरुद्ध स्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 3 नुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 3200 रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. या दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजय शिंदे करत आहेत.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.