जळगाव | प्रतिनिधी
शहरातील आदर्शनगरात शुक्रवारी पहाटे एका माथेफीरूने परिसरातील अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये उभी असलेली सात वाहने पेटवली. एका वाहनाचे टायर फुटल्याने मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला होता. या घटनेत १८ लाख २८ हजारांचे नुकसान झाले. हा माथेफीरु एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे. हातात कापड पेटवून वाहने जाळताना ताे दिसून आला आहे .
पाेलिस त्याचा शाेध घेताहेत. आदर्शनगर, गणपतीनगरात अंदाजे २५ वर्षांचा एक माथेफीरु शुक्रवारी पहाटे ३.३६ वाजता एका अपार्टमेंटच्या भिंतीवरून उडी मारून आत शिरला. एक कापड पेटवून पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना त्याने आग लावली. त्यानंतर तो पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येतो आहे.