DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तहसीलचा लाचखोर शिपाई एसीबीच्या जाळ्यात

एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले ; महसूल विभागात खळबळ

जळगाव । प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्विकारणा-या तहसील कार्यालयातील  शिपाई मगन गोबा भोई (रा. वाघ नगर जळगाव) यांना लाचलूचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला घटस्फोटीत असून तिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे फार्म स्वीकारणे व इतर कामे या शिपायाकडे आहे. मंगळवार दि. 27 रोजी तक्रारदार महिला तीचा अर्ज घेवून तहसिल कार्यालयात आली होती. शिपाई मगन गोबा भोई (रा. वाघ नगर, जळगाव) याने संजयगांधी निराधार योजनेचे फॉर्म स्वीकारुन मासिक अर्थसहाय्यक मंजुर करवुन देण्यासाठी 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

 

तडजोड होवून 2 हजार देण्यावर शिपाई ठाम होता. संशयीताला पैसे देण्याची ईच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने लाचलूचपत विभागाचे कार्यालय गाठून लेखी तक्रार केली. त्यानुसार आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात सापळा रचून लालचूचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने मगन भोई यांना रंगेहाथ लाच स्विकारतांना पकडले. या कारवाईमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ माजली होती.

या पथकाची कारवाई : ही कारवाई पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, अशोक अहिरे,सुनील पाटील, रवींद्र घुले,शैला धनगर, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.