DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तुम्हाला दीर्घायुषी बनवेल ‘ही’ हेल्दी थाळी

प्रत्येक व्यक्तीला ठाऊक आहे की निरोगी व हेल्दी आरोग्यासाठी निरोगी अन्न खूप महत्वाचं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की निरोगी अन्न म्हणजे काय आणि आपण ते आपल्या आहारात कसे समाविष्ट करू शकतो? वास्तविकत: मानवी शरीराला कार्य करण्यासाठी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांची आवश्यकता असते. वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांनी समृद्ध असलेले अन्न निरोगी अन्नाच्या श्रेणीमध्ये गणले जाते.

पण समस्या अशी आहे की आपल्याला हे सर्व तत्व एकाच खाद्यपदार्थात मिळू शकत नाहीत. अशा परिस्थितीत एका हेल्दी प्लेटची रचना किंवा सजावट कशी करावी, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये सर्व प्रकारची व आवश्यक पोषक तत्वं मिळतील? आपल्या या प्रश्नाचे उत्तर हार्वर्ड संशोधकांकडे आहे.

थाळीत असलं पाहिजे हेल्दी फॅट हॉवर्ड टी.एच. चेन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनिस्ट्स आणि हॉवर्ड हेल्थ पब्लिकेशन्सचे संपादक यांनी तयार केलेली हेल्दी इटींग प्लेट अमेरिकेच्या कृषी विभागातील (MyPlate) कमतरता दूर करण्यासाठी डिझाइन केली गेली होती. आम्ही सांगू इच्छितो की हेल्दी इटिंग प्लेट लोकांना चांगल्या खाद्यपदार्थांची निवड करण्यास मदत करते. हॉवर्डची टीम, ज्यांनी ही आरोग्यदायी खाण्याच्या थाळीची रचना केली आहे, ते सल्ला देतात की ही हेल्दी प्लेट प्लेट एक मार्गदर्शक म्हणून वापरली जावी. आपल्या आहारात मुख्यतः भाज्या, फळे, धान्य, हेल्दी फॅट आणि हेल्दी प्रथिनांचा समावेश करावा. यासोबतच गोड पेय पिणं देखील टाळावं व त्याऐवजी साधं पाणी पिण्याची सवय लावावी. तज्ञांनी सांगितले आहे की निरोगी राहण्यासाठी सक्रिय राहणे (active) आणि निरोगी वजन राखणे फार महत्वाचे आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.