धक्कादायक; धावत्या रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या
अमळनेर | प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकावर आज (दि.३१ रविवार) दुपारी २ वाजेच्या सुमारास २२ वर्षीय तरुणाने धावत्या मालगाडी समोर येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आली. या मुळे रेल्वेस्थनकावर एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळतात रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पाहणी केली असता सदर तरुण मृत अवस्थेत आढळून आला. तातडीने त्याच्या नातेवाईकांना फोन वर संपर्क करुन बोलण्यात आले. मृत व्यक्तीचे शव ग्रामीण रुग्णलयात शववि्छेदनासाठी हलविण्यात आले. मृत तरूण राकेश मधुकर वानखेडे असुन धुळे येथील महापालिकेत कार्यरत असुन मुळ-गाव लोखंडा ता.खामगाव जि.बुलढाणा येथील असून गेल्या दीड महिन्यापासून अमळनेर येथील बंगाली फाईल येथे आई-वडिलांसह वास्तव्यास होता व परिवारातील एकुलता एक होता. राकेशच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट नाही. पुढील तपास पोलीस नाईक, हिरालला चौधरी व पोलीस नाईक, हेमंत चौधरी करीत आहे.