DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

धक्कादायक; पिझ्झा खाताच मुलाच्या तोंडातून येऊ लागलं रक्त अन् मग…

नवी दिल्ली। हल्ली सर्वच जेवण व वेगवेगळे पदार्थ ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अनेक लोक कामावरून थकून आल्यावर किंवा घरी काही पार्टी असेल तसेच आपल्याला किंवा आपल्या मुलांना काही वेगळं खावंस वाटलं तर आपण लगेच मोबाईवरून आपल्याला पाहिजे ते ऑर्डर करतो.

त्यात अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पिझ्झा, बर्गर, पास्ता यांसारख्या पदार्थांची जरी नावं घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं व ते पदार्थ खावेसे वाटतात. मात्र पिझ्झा खाल्याने एका 8 वर्षीय मुलांसोबाबत विचित्र प्रकार घडला आहे. व तो प्रकार ऐकून मुलाच्या आईसह सर्वच हैराण झाले आहे. नक्की घटना काय आहे पाहुयात.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षाच्या या मुलाचा ओठ कापला गेला. या घटनेनंतर मुलाची आईदेखील हैराण झाली. जेस पामर नावाच्या महिलेनं रविवारी संध्याकाळी जेवणाच्या आधी आपला मुलगा स्टेनली याच्यासाठी पिझ्झा मागवला होता. पिझ्झा खात असताना या मुलाच्या तोंडात काहीतरी टोचल्याचं त्यानं सांगितलं. यानंतर या मुलाच्या तोंडातून काच किंवा प्लास्टिकचा एक टोकदार तुकडा निघाला. मुलाच्या आईनं सांगितलं, की हा तुकडा काचेचा होता, की प्लास्टिकचा याबाबत मी खात्रीनं सांगू शकत नाही, मात्र, माझ्या मुलाच्या जबड्यातून मोठ्या प्रमाणात रक्त येत होतं. हा तुकडा मला काचेप्रमाणे वाटला.

मुलाच्या आईनं सांगितलं, की पिझ्झा कंपनी असदा यांच्या वागणुकीमुळे त्या नाराज आहेत आणि पिझ्झा कंपनीनं त्यांना असं सांगितलं आहे, की ते याचा तपास करू शकत नाहीत, कारण याचं पॅकेजिंग त्यांनी केलेलं नव्हतं. महिलेनं म्हटलं, की ज्याला कोणाला या पिझ्झाचा भाग मिळाला आहे, त्यानं आतापर्यंत तो खाल्लाही असेल आणि ही अतिशय गंभीर बाब आहे. पिझ्झा कंपनी असदानं यासाठी माफी मागितली आहे.

मुलाच्या आईचं असं म्हणणं आहे, की त्यांनी याआधीही अनेकदा असदाचा पिझ्झा विकत घेतला आहे, कारण त्यांच्या मुलाला तो आवडतो. जेसनं म्हटलं, की पिझ्झा खायला सुरुवात करताच तिच्या मुलाच्या ओठांमधून मोठ्या प्रमाणात रक्त येऊ लागलं, हे पाहून ती हैराण झाली. ही घटना समोर आल्यानंतर लोक घाबरले आहेत. यावर कमेंट करत काही यूजरनं म्हटलं, की विकत घेतलेली कोणतीही वस्तू तुम्ही आधी तपासून मगच वापरायला हवी. ती कितीही चांगल्या कंपनीची असली तरीही.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.